सैनिक कल्याण विभागात लिपिक टंकलेखक (गट-क) भरती; ऑनलाइन अर्ज 26 नोव्हेंबरपर्यंत

पुणे, दि. 20 :सैनिक कल्याण विभाग आणि त्याअधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लिपिक टंकलेखक (गट-क) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

दिव्यांग उमेदवारांसाठी १ पद राखीव असून 40 टक्के अपंगत्व असलेल्या eligible उमेदवारांपैकी दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार आणि गुणवत्ता विचारात घेऊन निवड केली जाणार आहे.

ऑनलाइन अर्ज 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत

भरती प्रक्रिया TCS-ION याद्वारे राबविण्यात येणार असून अर्ज पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपातच स्वीकारले जातील.
उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी:

www.mahasainik.maharashtra.gov.in

ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत:
26 नोव्हेंबर 2025
रात्री 11.59 वाजेपर्यंत

अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध

पात्रता, अटी, परीक्षा पद्धती आणि इतर सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे एस. दै. (नि.) यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button