
पुणे, दि. 19 : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आमदार राघव चढ्ढा यांच्या घरी 19 ऑक्टोबर 2024 रोजी छोट्या राजकुमाराचे आगमन झाले. या गोड बातमीने संपूर्ण बॉलिवूडमध्ये आनंदाची लाट उसळली होती. आता बाळाला एक महिना पूर्ण होताच परिणीतीने त्याची पहिली अधिकृत झलक चाहत्यांसाठी शेअर केली आहे.
स्टार कपलनं त्यांच्या बाळाच्या इवल्याशा पावलांचा एक सुंदर फोटो शेअर करत नामकरणाचा खास उलगडा केला आहे. परिणीती आणि राघव यांनी आपल्या मुलाचं नाव ‘नीर’ ठेवलं असून, त्यामागचा अर्थही त्यांनी खास पोस्टद्वारे समजावून सांगितला आहे.
इंस्टाग्रामवरील या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे —
“जलस्य रूपम, प्रेमस्य स्वरूपम् – तत्र एव नीर।
आमच्या मनाला या जीवाच्या अनंत थेंबाएवढी शांतता मिळाली. आम्ही त्याचं नाव ‘नीर’ ठेवलं. शुद्ध, दिव्य, असीम.”
विशेष म्हणजे, ‘नीर’ हे नाव परिणीती आणि राघव यांच्या नावातील अक्षरांचं अप्रतिम कॉम्बिनेशन असल्याने चाहत्यांना ते अधिकच भावत आहे. सोशल मीडियावर या पोस्टला चाहते मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत असून ‘नीर’ या चिमुकल्या स्टारकिडबद्दल प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.