मालेगावात 3 वर्षीय चिमुरडीवर अमानुष अत्याचार; आरोपी पोलिस कोठडीत

पुणे, दि. 19 : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. केवळ तीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला असून गावभर तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, 16 नोव्हेंबर रोजी गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनर याने अल्पवयीन मुलीवर प्रथम अमानुष अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले.

या भीषण घटनेनंतर गावात भीती आणि रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित मुलीचा मृतदेह घरी आणताच एकच आक्रोश उसळला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आरोपीचे मुलीच्या वडिलांशी पूर्वी भांडण झाले होते आणि त्याचा राग आरोपीने या अमानवी कृतीतून काढल्याची चर्चा आहे.

मालेगाव तालुका पोलिसांनी आरोपी विजय खैरनरला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला 20 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाची चौकशी अत्यंत गांभीर्याने सुरू आहे.

दरम्यान, राज्यमंत्री दादा भुसे आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणाला फास्टट्रॅक कोर्टात नेण्याचा आणि सुप्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक करण्याचा शब्द दिला आहे.

या क्रूर घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. गावकरी तसेच सामाजिक संघटनांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button