आय पॉपस्टारच्या प्री-फिनालेत अभिजीत सावंतची ‘मोहब्बतें’ची जादू; नव्या ट्विस्टसह परफॉर्मन्स व्हायरल

पुणे दि. 18 : सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या आय पॉपस्टार या गाण्यांच्या शोच्या प्री-फिनालेमध्ये इंडियन आयडॉल फेम आणि पहिला विजेता अभिजीत सावंत सहभागी झाला. त्याने आपल्या एव्हरग्रीन हिट ‘मोहब्बतें लुटाऊंगा’ या गाण्याचं GenZ ट्विस्ट व्हर्जन सादर करत प्रेक्षकांना अक्षरशः मोहित केले.

राधिका भिडे, रोहित राऊत यांसारख्या मराठमोळ्या कलाकारांसह अनेक उमदे गायक या शोमध्ये दर आठवड्याला परफॉर्म करत असून, या विशेष भागात अभिजीतची एन्ट्री हा कार्यक्रमाचा मोठा आकर्षणबिंदू ठरला.

अभिजीतचा या खास परफॉर्मन्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्याच्या सदाबहार आवाजाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

प्री-फिनालेविषयी बोलताना अभिजीत म्हणाला,
“आय पॉपस्टारसारख्या शोवर पाहुणा म्हणून जाणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. अनेक तरुण, प्रतिभावान म्युझिशन्सना इतकं सुंदर सादरीकरण करताना पाहून खूप आनंद झाला. हा शो आजच्या काळात मूळ संगीताला उत्तम प्रकारे प्रोत्साहन देतो. या निमित्तानं ‘मोहब्बतें लुटाऊंगा’चं एक वेगळं GenZ व्हर्जन प्रेक्षकांसमोर सादर करता आलं आणि तेही व्हायरल झालं.”

२०२५ हे वर्ष अभिजीत सावंतच्या संगीत प्रवासातील २० वर्षांचा टप्पा असून या निमित्ताने त्याने दिलेला हा परफॉर्मन्स प्रेक्षकांसाठी खास ठरला. लवकरच अभिजीत एका नव्या म्युझिक प्रोजेक्टसह प्रेक्षकांसमोर येणार असल्याची माहितीही त्याने दिली.

या दमदार परफॉर्मन्समुळे आय पॉपस्टारचा प्री-फिनाले अधिक रंगतदार झाला असून प्रेक्षक आता ग्रँड फिनालेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button