राजीव गांधी प्राणी संग्राहालयाच्या तिकीट दरात वाढ

पुणे दि. 18 : पुणे शहरातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. कात्रज येथील या लोकप्रिय प्राणीसंग्रहालयात दररोज मोठ्या संख्येने पर्यटक, विद्यार्थी आणि नागरिक भेट देतात. वाढीव तिकीट दर १ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार आहेत.

नवीन दरांनुसार लहान मुलांचे तिकीट १० वरून २० रुपये, तर प्रौढांचे तिकीट ४० रुपयांवरून ६० रुपये करण्यात आले आहे. विदेशी पर्यटकांसाठीचे तिकीट १०० वरून १५० रुपये, तसेच महापालिका, जिल्हा परिषद व इतर शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांचे तिकीट ५ वरून १० रुपये करण्यात आले आहे.

महापालिकेकडून प्राणीसंग्रहालयाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार सुरू असून, झेब्रा, पिसोरी हरीण, लायन टेल्ड मकाक यांसारख्या नव्या प्रजातींसाठी खास प्रदर्शनस्थळे तयार केली जात आहेत. प्राण्यांच्या आहाराचा खर्च, सेवकांचे मानधन, खंदकांची देखभाल, दुरुस्ती आणि विकास प्रकल्पांवर वाढत्या खर्चामुळे तिकीट दरवाढ केल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button