बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे (बीएआय) २९ व्या ‘वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन’चे आयोजन

पुणे : बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीला सन्मानित करणारी प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील ‘वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन’ यंदा २९ व्या वर्षात पदार्पण करत आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून याबाबतची माहिती बीएआय पुणेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी बीएआय महाराष्ट्र अध्यक्ष जगन्नाथ जाधव, सचिव मनोज देशमुख, स्पर्धेचे समन्वयक सुनील मते, उपाध्यक्ष राजाराम हजारे, महेश मायदेव, सचिव सी. एच. रतलानी आणि खजिनदार महेश राठी उपस्थित होते.

अजय गुजर म्हणाले, “देशभरातील २५० पेक्षा अधिक केंद्रांपैकी बीएआय पुणे सेंटर सर्वात सक्रिय आहे. वर्षभरात विविध शैक्षणिक व व्यावसायिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. ‘वेल बिल्ट स्ट्रक्चर स्पर्धा’ ही उत्कृष्ट गुणवत्ता आणि बांधकाम तंत्रज्ञान यांना गौरवणारी सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा असून १९९७ पासून सातत्याने आयोजित होत आहे.”

स्वतंत्र तज्ज्ञ ज्युरीमार्फत मूल्यांकन

स्पर्धेचे समन्वयक सुनील मते यांनी सांगितले की, “देशभरातील कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक आणि तरुण उद्योजकांनी केलेल्या उत्कृष्ट कामांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा महत्वाची ठरते. विजेते स्वतंत्र तज्ज्ञ ज्युरीमार्फत निवडले जातात. सिव्हिल इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, बिल्डिंग सर्व्हिसेस, ग्रीन बिल्डिंग आणि सेफ्टी या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ ज्युरीत असतात. प्रथम प्राथमिक निवड, त्यानंतर प्रकल्प सादरीकरण आणि शेवटी साइट व्हिजिटद्वारे कठोर निकषांवर मूल्यांकन केले जाते.”

१६ प्रकारांमध्ये स्पर्धा

यंदा स्पर्धा खालील १६ प्रकारांमध्ये होणार आहे:

निवासी – बंगला / रो हाऊस / फार्महाऊस

निवासी – स्टँडअलोन सिंगल प्लॉट

निवासी – सिंगल प्लॉट रिडेव्हलपमेंट

निवासी – मल्टी बिल्डिंग प्रोजेक्ट

व्यावसायिक – मॉल्स, ऑफिसेस, शॉपिंग सेंटर, हॉस्टेल्स

व्यावसायिक – इन्स्टिट्युशनल / हॉस्पिटल / आयटी पार्क

पुणे/मुंबई बाहेरील – निवासी रचना

पुणे/मुंबई बाहेरील – व्यावसायिक स्ट्रक्चर

औद्योगिक प्रकल्प

इन्फ्रास्ट्रक्चर – ब्रिज, फ्लायओव्हर, अंडरपास

इन्फ्रास्ट्रक्चर – ESR, GSR, STP, ETP

इन्फ्रास्ट्रक्चर – रस्ते प्रकल्प, व्हायाडक्ट, अक्वाडक्ट

शासन व उप-शासकीय – निवासी / ऑफिस प्रकल्प

शासन व उप-शासकीय – व्यावसायिक व विशेष इमारती

लँडस्केप – गार्डन, पब्लिक पार्क्स (80% सॉफ्टस्केप)

बेअर शेलपर्यंतचे काम – RCC, मॅसनरी, प्लास्टर

या स्पर्धेमुळे बांधकाम क्षेत्रात गुणवत्ता, सुरक्षितता आणि नवनवीन तंत्रज्ञानाला चालना मिळत असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button