2024 बांगलादेश हिंसाचार प्रकरणात शेख हसीना दोषी

पुणे, दि. 17 : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 2024 च्या हिंसक आंदोलनप्रकरणी मानवतेविरुद्ध गुन्हे केल्याबद्दल आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्यूनल (ICT) ने हा महत्त्वपूर्ण निकाल जाहीर केला.

2024 मध्ये बांगलादेशभर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला होता. या घटनांबाबत हसीना यांच्यावर हत्या, अत्याचार आणि मानवतेविरुद्ध गुन्ह्यांचे आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, या सर्व आरोपांना शेख हसीना यांनी सतत फेटाळून लावले आहे.

हिंसाचारानंतर जुलै 2024 मध्ये शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि नंतर भारतात आश्रय घेतला. त्यानंतर त्यांच्या विरोधातील अनेक याचिका दाखल झाल्या. या सर्व प्रकरणांचा एकत्रित निकाल आज न्यायाधिकरणाने दिला असून त्यात शेख हसीना दोषी ठरल्या आहेत.सध्या शेख हसीना भारताच्या आश्रयाला असल्याने त्यांच्या प्रत्यर्पणासाठी बांगलादेश सरकार भारतावर राजनैतिक दबाव आणू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button