
पुणे दि.17 : राज्यसभा खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारामुळे सक्तीची विश्रांती घेत होते. डॉक्टरांनी त्यांना काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी 31 ऑक्टोबरपासून घराबाहेर पडणे पूर्णपणे बंद केले होते. मात्र आज, बाळासाहेब ठाकरे यांच्या 13 व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांनी तब्येतीची पर्वा न करता घराबाहेर पडत उपस्थिती नोंदवली.
सोमवारी संजय राऊत दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर दाखल झाले. शर्ट-पँट अशा साध्या पेहरावात आणि तोंडावर संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क घातलेला होता. गाडीतून उतरल्यानंतर ते आपल्या बंधू सुनील राऊत यांच्या आधाराने स्मृतीस्थळापर्यंत चालत गेले.
स्मृतीस्थळावर पोहोचताच त्यांनी आपल्या लाडक्या साहेबांना अभिवादन केले. तब्येतीच्या अडचणी असूनही त्यांनी स्मृतीदिनाला हजेरी लावल्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांमध्ये विशेष चर्चा रंगली आहे.