निवडणुकीत पैसे लागतात”— प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्याने खळबळ

पुणे दि. 16: बिहार निवडणुकांदरम्यान आचार संहितेचे उल्लंघन झाल्याची चर्चा सुरू असताना महिलांच्या खात्यात हजारो रुपयांचे व्यवहार झाल्यामुळे विरोधकांनी भाजप व निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यातील पक्षाच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

“घरी बसून कोणी वोट करणार नाही… वातावरण तयार करा. निवडणुकीसाठी पैसे लागतात. पैशांच्या पुढे ‘मी निवडून येणारच’ म्हणणं चालत नाही. आम्ही अनेक बाहुबलींना निवडून आणलं आहे. आपण सक्षम आहोत, इतरांनी आपली चिंता करावी… समझनेवालो को इशारा काफी है,” असे वादग्रस्त वक्तव्य पटेल यांनी केले.

त्यांच्या या विधानाचा रोख नेमका कुणाकडे होता, याची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. पैशांचा उल्लेख करताना त्यांनी अप्रत्यक्षरीत्या निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.पटेल यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी उधाण

आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button