
पुणे दि. 15 : हिवाळ्याच्या मौसमात शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी मेथीचे सेवन अत्यंत उपयुक्त मानले जाते. तज्ज्ञांच्या मते मेथीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असल्याने ती हिवाळ्यातील आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
हिवाळ्यात मेथी खाल्ल्याने शरीराला आतून उबदारपणा मिळतो आणि थंडीमुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते. मेथीतील अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, ज्यामुळे सर्दी-खोकला, व्हायरल इन्फेक्शनसारख्या हंगामी त्रासांचा धोका कमी होतो.मधुमेह असणाऱ्यांसाठीही मेथी फायदेशीर असून यात असलेले गॅलेक्टोमनन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे हाडे व सांधे मजबूत होतात, ज्यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी आणि पाठदुखीत आराम मिळतो.
मेथीतील उच्च प्रमाणातील फायबरमुळे पचन सुधारते, आतडे स्वच्छ राहतात आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होतात. नियमितपणे मेथीचे सेवन केल्याने वजन कमी करण्यासही मदत होते. त्वचेसाठीही मेथी उपयुक्त असून तिच्यातील विटॅमिन्स व अँटिऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवत.हृदयाच्या आरोग्यासाठीदेखील मेथी उपयुक्त मानली जाते. नियमित सेवनाने वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी होण्यास मदत होते.