
पुणे दि. 12 नोव्हेंबर : नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 शांततेत व निष्पक्ष पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कठोर आदेश जारी केले आहेत. हे आदेश 3 डिसेंबर 2025 पर्यंत लागू राहतील.
या आदेशानुसार मिरवणुका, सभा, मोर्चे, घोषणाबाजी, तसेच ध्वनीक्षेपकाचा परवाना नसताना वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक प्रचारासाठी 10 पेक्षा अधिक वाहनांचा ताफा वापरण्यावरही निर्बंध असतील.
प्रचाराच्या वाहनांवर झेंडे आणि फलक ठराविक नियमांनुसारच लावावे लागतील, अन्यथा संबंधितांवर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलमान्वये कारवाई होईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे