पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल — “अजित पवारांनी द्यावा राजीनामा!”

पुणे दि. 12 : कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमीन खरेदी प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत सापडले आहेत. या जमीन व्यवहारावरून विरोधकांनी आधीच टीकास्त्र सोडले असताना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट हल्लाबोल केला आहे.दमानियांनी सवाल उपस्थित केला आहे की, “अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांच्या मुलावर झालेल्या जमीन घोटाळ्याची चौकशी निष्पक्षपणे होऊ शकेल का?” तसेच त्यांनी अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

अंजली दमानिया यांनी पुढे आरोप करताना सांगितले की“आमेडिया इंटरप्रिंसेस ही लिमिटेड लायबलिटी पार्टनरशिप कंपनी आहे. पार्थ पवार यांनी जर सांगितले असते की मला या कराराची कल्पना नव्हती, तर फक्त दिग्विजय पाटील अडकले असते. मात्र दोन्ही पार्टनरच्या सह्या या दस्तावेजावर आहेत. पार्थ पवार कंपनीत 99 टक्के भागीदार आहेत, त्यामुळे त्यांना व्यवहाराची पूर्ण कल्पना होती.”त्या पुढे म्हणाल्या की, “एफआयआरमध्ये पार्थ पवारांचं नाव न घालणं म्हणजे वाचवण्याचे प्रयत्न आहेत. हा गंभीर प्रकार आहे, आणि या प्रकरणात दोषींना 7 ते 14 वर्षांची शिक्षा तसेच दंड होऊ शकतो.”

दमानियांनी चौकशी कमिटीवरही प्रश्न उपस्थित केला.

“या कमिटीतील सहा सदस्यांपैकी पाच पुण्याचेच आहेत. त्यामुळे पालकमंत्र्याच्या मुलाविरुद्ध निष्पक्ष चौकशी होईल का, हा मोठा प्रश्न आहे. जर हा व्यवहार ‘पॉवर ऑफ अटॉर्नी’द्वारे झाला असेल, तर तो सरळ सरळ फसवणुकीचा प्रकार आहे.”जून महिन्यात बोटॅनिकल गार्डनने जिल्हाधिकाऱ्यांना जमीन ताब्यात घेतल्याबाबत पत्र लिहिलं होतं, पण प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. “त्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं,” अशी मागणी देखील दमानियांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button