राष्ट्रवादीत मोठा बदल : अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे प्रवक्तेपदावरून वगळले

पुणे दि. 10 : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहिलेले अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्तेपदावरून वगळण्यात आले आहे. पक्षाने नव्या १७ प्रवक्त्यांची यादी जाहीर केली असून यात या दोघांची नावे नाहीत.नवीन प्रवक्त्यांमध्ये हेमलता पाटील आणि प्रतिभा शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यादीत अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी, रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, शशिकांत तरंगे, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सुरज चव्हाण, विकास पासलकर आणि श्याम सनेर यांचा समावेश आहे.प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सर्व जुन्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करून ही नवी यादी जाहीर केली आहे.

अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे अलीकडेच महायुतीत तणाव निर्माण झाला होता, तर रुपाली ठोंबरे यांनी पक्षातीलच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या टीकेमुळे वाद निर्माण झाला होता.तसेच, वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांनाही प्रवक्तेपदावरून हटवण्यात आले आहे. दरम्यान, पूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरणानंतर पद गमावलेले सुरज चव्हाण यांची पुन्हा एकदा प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button