
गुरुग्राम : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) यांना गुरुग्राम, हरियाणा येथे झालेल्या १८ व्या अर्बन मोबिलिटी इंडिया (यूएमआय) राष्ट्रीय परिषदेत “द्वितीय सर्वोत्कृष्ट प्रदर्शक पुरस्कार” मिळाला आहे. तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोप दिनी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
हा पुरस्कार भारत सरकारचे गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्री मा. श्री. मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते महा मेट्रोकडून श्री. अतुल गाडगीळ, संचालक (कार्य) आणि श्री. अनिल कोकाटे, संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) यांनी स्वीकारला. महा मेट्रोच्या उत्कृष्ट सादरीकरणाची, नाविन्यपूर्ण प्रदर्शनाची आणि माहितीच्या प्रभावी प्रसारणाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य राज्यमंत्री श्री. टोकन साहू, मंत्रालयाचे सचिव श्री. श्रीनिवास कटिकिथला, ओएसडी श्री. जयदीप तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत आयोजित १८ वी यूएमआय परिषद “Urban Development and Mobility Nexus” या विषयावर केंद्रित होती. महा मेट्रोकडून सादर केलेल्या उपक्रमांना शाश्वत शहरी परिवहनाच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे विशेष ओळख मिळाली.या प्रसंगी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य राज्यमंत्री श्री. टोकन साहू, मंत्रालयाचे सचिव श्री. श्रीनिवास कटिकिथला, ओएसडी श्री. जयदीप तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत आयोजित १८ वी यूएमआय परिषद “Urban Development and Mobility Nexus” या विषयावर केंद्रित होती. महा मेट्रोकडून सादर केलेल्या उपक्रमांना शाश्वत शहरी परिवहनाच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे विशेष ओळख मिळाली.विशेषतः फर्स्ट आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, डिजिटल प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट आणि मल्टिमोडल इंटिग्रेशन या क्षेत्रांतील उपक्रम अधोरेखित करण्यात आले. “One Journey, One Vision – Connecting Tomorrow” या संकल्पनेवर आधारित महा मेट्रोच्या स्टॉलमध्ये अखंड आणि एकात्मिक वाहतूक सुविधा पुरविण्याच्या संस्थेच्या दृष्टीकोनाचे दर्शन घडविण्यात आले.
या प्रदर्शनात मेट्रो संवाद सारख्या जनसंपर्क उपक्रमांसह डिजिटल प्रोजेक्ट मॅनेजमेंट, ओ अँड एम प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट आणि मल्टिलेयर ट्रान्सपोर्टेशन सिस्टम यांसारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचेही प्रदर्शन करण्यात आले. या स्टॉलला परिषदेतील प्रतिनिधी आणि भेट देणाऱ्यांकडून मोठा प्रतिसाद आणि प्रशंसा मिळाली.देशभरातील विविध मेट्रो प्रकल्पांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला होता, आणि नावीन्य, सादरीकरण व संप्रेषणातील प्रभावीपणाच्या निकषांवर विविध स्टॉलचे मूल्यमापन करण्यात आले.