थकबाकीदार पुणेकरांसाठी दिलासादायक निर्णय! PMCची ‘अभय योजना’ जाहीर — दंडात तब्बल ७५ टक्के सूट

पुणे, दि. ९ :
पुणे महानगरपालिकेने (PMC) थकबाकीदार मिळकत धारकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. ‘अभय योजना’ अंतर्गत पुणेकरांना मिळकत कराच्या दंडाच्या रकमेत तब्बल ७५ टक्के सूट मिळणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या योजनेची घोषणा केली.

महापालिकेकडे मिळकतदारांकडून सुमारे १२ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी मूळ कर ३,१५८ कोटी तर दंडाची रक्कम ९ हजार कोटी आहे. वर्षानुवर्षे थकबाकीवर दर महिन्याला २% व्याज आकारल्यामुळे ही रक्कम मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

महापालिकेने या योजनेतून ५,४०८ कोटी रुपये इतका मिळकतकर वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, ज्या १ लाख ४० हजार ४३७ मिळकतदारांनी यापूर्वीच्या ‘अभय योजने’चा लाभ घेतला आहे, आणि तरीही पुन्हा थकबाकीदार झाले आहेत, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

पुणेकरांनी या योजनेचा लाभ घेऊन थकीत मिळकत कर भरून घ्यावा आणि मोठ्या सवलतीचा फायदा घ्यावा, असे महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button