आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लग्नबंधनात; केळवण समारंभाला मराठी कलाकारांची उपस्थिती

पुणे दि. 8 : होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचलेले अभिनेता आणि दिग्दर्शक आदेश बांदेकर यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या मुलगा सोहम बांदेकर याचं लग्न ठरण्याची अधिकृत घोषणा झाली असून, त्यानिमित्ताने नुकताच केळवण समारंभ पार पडला.
या समारंभाला मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर कलाकारांनी उपस्थित राहून सोहमला आशीर्वाद दिला. सुकन्या मोने, शिल्पा नवलकर आणि अभिजित केळकर यांसारख्या लोकप्रिय कलाकारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
सोहम बांदेकर स्वतःही मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असून, तो अभिनेता व निर्माता आहे. त्याने ललित 205 या मालिकेची निर्मिती केली आहे, तसेच नवे लक्ष्य या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सध्या सोशल मीडियावर सोहम चर्चेत आहे कारण तो लवकरच मराठी अभिनेत्री पूजा बिरारी सोबत विवाहबद्ध होणार आहे.
आदेश बांदेकर यांच्या कुटुंबातील या आनंदसोहळ्यामुळे मराठी कलाविश्वातही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.