
पुणे : विकी कौशल आणि कतरीना कैफ यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांच आगमन झालं आहे. वयाच्या 42 वर्षी कतरिनाने मुलाला जन्म दिला आहे. विकी कौशलने सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी दिली.
विक्की कौशलनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यानं लिहिलंय की, “आमच्या आनंदाचं आगमन झालंय… अपार प्रेम आणि कृतज्ञतेनं, आम्ही आमच्या मुलाचं स्वागत करतोय… 7 नोव्हेंबर 2025… कतरिना आणि विक्की…”