महाबिझ २०२६ : पुण्याच्या उद्योजकांसाठी जागतिक व्यासपीठ

पुणे, दि. [दिनांक] :
दुबईस्थित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संस्था GMBF Global च्या वतीने होणाऱ्या ‘महाबिझ २०२६’ या जागतिक व्यावसायिक अधिवेशनाचा पुण्यातील उद्योगजगतासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत GMBF Global Dubai चे अध्यक्ष डॉ. सुनील मांजारेकर, महासचिव विवेक कोल्हटकर, आयोजन सचिव नितिन सास्तकर, मीडिया डायरेक्टर अशोक सावंत, तसेच भारतातील मीडिया आणि संचार विभागाचे दिलीप खेड़ेकर, देवा सोळंकी आणि जितेंद्र जोशी उपस्थित होते.

महाबिझ २०२६ हे अधिवेशन येत्या ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुबईमध्ये होणार असून त्यामध्ये पुण्यातील उद्योगपती, स्टार्टअप संस्थापक आणि आयटी-मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

या पार्श्वभूमीवर ७ नोव्हेंबर रोजी पुण्यात पत्रकार भवन आणि MCCIA येथे महाबिझ रोड शो आयोजित करण्यात आला आहे. पुण्यातील MCCIA, Saturday Club, BBNG, GIBF यांसारख्या उद्योगसंघटनांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.

महाबिझमुळे पुण्याच्या उद्योगजगताला जागतिक नेटवर्किंग, गुंतवणुकीच्या संधी, नव्या बाजारपेठा आणि संयुक्त उपक्रमांची दारे खुली होणार आहेत.
पुण्यातील कंपन्यांना सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ली बर्ड २०% सवलतीची संधी उपलब्ध आहे.

या वर्षीच्या अधिवेशनात १५ हून अधिक देश, ८०० पेक्षा जास्त उद्योजक सहभागी होणार असून “Young Leaders Panel” आणि “Buyer–Seller Meet” अशी नवी सत्रेही आयोजित करण्यात आली आहेत.

“महाबिझ ही केवळ परिषद नाही, तर महाराष्ट्रातील उद्योग आणि जागतिक बाजारपेठांमधील सेतू आहे,” असे GMBF Global चे अध्यक्ष डॉ. सुनील मांजारेकर यांनी सांगितले.

🔗 अधिक माहितीसाठी: www.mahabiz2026.com

📩 संपर्क: mahabiz2026@gmbfglobal.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button