पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत; झोक्यावर खेळणाऱ्या चिमुकल्यावर हल्ल्याचा प्रयत्न

पुणे, दि. ६ : पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अलीकडे बिबट्याची दहशत वाढताना दिसत आहे. खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे एका घराच्या अंगणात झोक्यावर खेळत असताना बिबट्या थेट घरात घुसल्याचा थरारक प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, झोक्यावर खेळत असलेल्या लहान मुलाने एका मांजरीचा पाठलाग करणारा बिबट्या पाहिला आणि तत्काळ आपल्या आई-वडिलांना याची माहिती दिली. तोपर्यंत बिबट्या घरातून पळून गेला. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

गेल्या काही महिन्यांत पुणे जिल्ह्यातील विविध भागांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात १४ वर्षीय रोहन बोंबे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता.

या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button