
वडारवाडी, भैय्यावाडी आणि पोलिस लाईन परिसरात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
साळेगावकर यांच्या वतीने हजारो महिलांना विविध बक्षिसांचे वाटप
वडारवाडी, भैय्यावाडी आणि पोलिस लाईन परिसरात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, ७ ऑक्टोबर २०२५:
कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी परिसरातील महिलांसाठी महाभोंडला आणि भव्य लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस रविंद्र साळेगावकर यांच्या वतीने करण्यात आले.
हा उपक्रम आदिशक्ती जगदंबा माता नवरात्र उत्सव समिती वडारवाडी, वीर नेताजी तरुण मंडळ भैय्यावाडी आणि अखिल पोलिस लाईन मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या कार्यक्रमांना परिसरातील हजारो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात सहभागी महिलांना विविध बक्षिसे देण्यात आली — मानाची पैठणी, मिक्सर, कुकर, तवा, ज्यूसर यांसारख्या आकर्षक बक्षिसांनी महिलांचा आनंद द्विगुणित झाला. प्रत्येक सहभागी महिलेला देखील एक विशेष भेटवस्तू देण्यात आली.
रविंद्र साळेगावकर म्हणाले,
“धावपळीच्या जीवनात महिलांवर अनेक जबाबदाऱ्या असतात. या कार्यक्रमामुळे महिलांना स्वतःसाठी वेळ देता आला, त्यांचे छंद आणि आनंद व्यक्त करता आला. या उपक्रमातून सामाजिक एकतेचा आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश मिळतो.”
या प्रसंगी कल्पेश मोरे, सुरज जोशी, अनिता शहाणे, वैजयंती सोळवे, हर्षनील शेळके, किरण ओरसे, राजेश नायडू यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.