गेरा डेव्हलपमेंट्सकडून “मीट द आयकॉन – श्यामक दावर” कार्यक्रमाचे आयोजन

गेरा’स जॉय ऑन द ट्रीटॉप्स, हिंजवडी येथे कला, नृत्य आणि प्रेरणेची रंगतदार संध्या

गेरा डेव्हलपमेंट्सकडून “मीट द आयकॉन – श्यामक दावर” कार्यक्रमाचे आयोजन

गेरा’स जॉय ऑन द ट्रीटॉप्स, हिंजवडी येथे कला, नृत्य आणि प्रेरणेची रंगतदार संध्या

पुणे, ६ ऑक्टोबर २०२५ : रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रगण्य नाव गेरा डेव्हलपमेंट्स प्रा. लि. (Gera Developments Pvt. Ltd.) यांनी भारतातील नामांकित नृत्यदिग्दर्शक श्यामक दावर यांच्या उपस्थितीत “मीट द आयकॉन” हा विशेष कार्यक्रम हिंजवडी येथील गेरा’स जॉय ऑन द ट्रीटॉप्स या प्रकल्पात साजरा केला. या कार्यक्रमात गेरा’स चाइल्डसेंट्रिक® होम्सचे रहिवासी आणि पाहुण्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

श्यामक दावर यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत मुलांसोबत नृत्य सत्र घेतले आणि “पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रोत्साहन द्यावे” असा संदेश दिला.

गेरा डेव्हलपमेंट्सचे चेअरमन कुमार गेरा म्हणाले,
“घर हे केवळ आरामाचे ठिकाण नसून मुलांच्या सर्वांगीण विकासाचे व्यासपीठ आहे. ‘चाइल्डसेंट्रिक® होम्स’ या संकल्पनेद्वारे आम्ही मुलांना प्रेरणादायी वातावरण आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन देत आहोत.”

कार्यक्रमातील खास आकर्षण होते कुमार गेरा आणि श्यामक दावर यांच्यातील ‘फायरसाईड चॅट’ सत्र, ज्यात दोघांनीही सर्जनशीलतेचे महत्त्व, संघर्ष, आणि कला-शिक्षणातील नवकल्पना यांवर विचारमंथन केले.

गेरा डेव्हलपमेंट्सने या उपक्रमाद्वारे पुन्हा एकदा आपल्या रहिवाशांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या वचनबद्धतेला अधोरेखित केले आहे. गेरा’स चाइल्डसेंट्रिक® होम्सने आतापर्यंत शंकर महादेवन, पुल्लेला गोपीचंद, महेश भूपती, बायचुंग भुटिया, रोहित शर्मा, निशा मिलेट आणि श्यामक दावर यांसारख्या नामवंत व्यक्तींशी भागीदारी केली असून, कला, क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकासाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण थेट रहिवाशांच्या समुदायांपर्यंत पोहोचवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button