ग्लोबललॉजिक तर्फे रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूलमध्ये STEM इनोव्हेशन लॅबचा शुभारंभ

‘रोबो शिक्षा केंद्र’ – वंचित विद्यार्थिनींसाठी रोबोटिक्स, AI आणि कोडिंगचे प्रत्यक्ष शिक्षण

पुणे, २४ सप्टेंबर २०२५ : डिजिटल प्रॉडक्ट इंजिनिअरिंगमध्ये आघाडीवर असलेली हिताची ग्रुप कंपनी ग्लोबललॉजिक (GlobalLogic) ने इंडिया STEM फाउंडेशनच्या सहकार्याने पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल येथे पहिले STEM इनोव्हेशन लॅब – “रोबो शिक्षा केंद्र” सुरू केले. हा उपक्रम कंपनीच्या ‘Educate to Empower’ या CSR कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आला असून, इयत्ता ६वी ते ९वीतील ७६३ विद्यार्थिनींना रोबोटिक्स, AI, इलेक्ट्रॉनिक्स आणि कोडिंगचे प्रत्यक्ष शिक्षण मिळणार आहे.

या लॅबमधून विद्यार्थिनींची चिकित्सक विचारसरणी, नावीन्यपूर्ण कल्पना आणि तांत्रिक आत्मविश्वास वाढेल. तसेच शिक्षकांनाही प्रशिक्षण देऊन STEM शिक्षणाचा दीर्घकालीन प्रभाव साधता येणार आहे.

या उद्घाटन समारंभाला श्रीमती कमलादेवी आवटे (उपसंचालक – SCERT, महाराष्ट्र) आणि श्री. सुधांशु शर्मा (संस्थापक व संचालक – इंडिया STEM फाउंडेशन) उपस्थित होते.

ग्लोबललॉजिकच्या CSR प्रमुख मोनिका वालिया म्हणाल्या,
“आर्थिक अडचणींमुळे ५९% मुली STEM शिक्षण अर्धवट सोडतात. तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष शिक्षण उपलब्ध करून आम्ही या तफावतीत बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

ग्लोबललॉजिकचे वरिष्ठ उपाध्यक्ष – अभियांत्रिकी विक्रम पुराणिक म्हणाले,
“पुणे हे आयटी आणि शिक्षणाचे केंद्र आहे. येथे रोबोटिक्स आणि AI चे शिक्षण वंचित विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे म्हणजे भविष्यातील नाविन्यपूर्ण पिढी घडविण्याकडे महत्त्वाचे पाऊल आहे.”

या लॅबमधून आधीच सकारात्मक परिणाम दिसत असून, शाळेतील ‘Future Femmes’ या विद्यार्थिनींच्या टीमने वर्ल्ड रोबोट ऑलिम्पियाडच्या राष्ट्रीय फेरीत स्थान मिळवले आहे. त्यांचा AI व IoT आधारित ‘अमृतदर्पण’ प्रकल्प पाण्याच्या गुणवत्तेवर उपाय सुचवतो.

ग्लोबललॉजिकचा STEM Innovation Lab उपक्रम २०२२ मध्ये नोएडा येथे सुरू झाला आणि आज देशभरातील सहा लॅबमधून ४,७०० हून अधिक विद्यार्थ्यांना STEM शिक्षणाची संधी मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button