मणिपाल हॉस्पिटल्स, खराडी येथे 70 वर्षीय महिलेवर TAVI व बलून-असिस्टेड BASILICA शस्त्रक्रिया यशस्वी

दुर्मिळ मिनिमली इन्व्हेजिव्ह प्रक्रिया – ओपन हार्ट सर्जरीच्या मोठ्या जोखमीपासून बचाव

पुणे: मणिपाल हॉस्पिटल्स, खराडी, पुणे येथील कार्डिओलॉजी टीमने 70 वर्षीय महिलेवर ट्रान्सकॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (TAVI) सोबत दुर्मिळ बलून-असिस्टेड BASILICA प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत रुग्णाचे प्राण वाचवले.

रुग्णाला स्थूलपणा, उच्चरक्तदाब, COPD, OSA, हायपोथायरॉइझम आणि गंभीर एऑर्टिक स्टेनोसिसचा त्रास होता. ओपन हार्ट सर्जरीचा पर्याय उच्च जोखमीचा असल्याने कुटुंबाने मिनिमली इन्व्हेजिव्ह प्रक्रियेला पसंती दिली.

ही प्रक्रिया डॉ. तन्मय यरमळ जैन (कन्सल्टन्ट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट), डॉ. सूरज नृसिंहन आणि कार्डिओलॉजी टीमने केली. प्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी रुग्णाला चालता येऊ लागले आणि चौथ्या दिवशी त्यांना सुरक्षितपणे डिस्चार्ज देण्यात आला.

डॉ. तन्मय जैन म्हणाले,
“रुग्णाच्या हृदय व रक्तवाहिन्यांच्या रचनेमुळे TAVI दरम्यान कोरोनरी आर्टरी ब्लॉकेजचा धोका होता. त्यामुळे आम्ही बलून-असिस्टेड BASILICA तंत्राचा वापर केला. यात इलेक्ट्रिक गाईडवायर्स आणि बलूनच्या साहाय्याने खराब झालेल्या झडपेचे विभाजन केले जाते, ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि त्यानंतर नवीन झडप बसवता येते. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पूर्णपणे पायावाटे, शरीरावर एकही टाका न घेता करण्यात आली.”

मणिपाल हॉस्पिटल्स, खराडीचे हॉस्पिटल डायरेक्टर श्री. परमेश्वर दास म्हणाले,
“आम्ही देशातील काही गुंतागुंतीच्या कार्डिअॅक केसेस हाताळत आहोत. TAVI सह BASILICA प्रक्रिया क्वचितच केली जाते, परंतु आमच्या कार्डिओलॉजी टीमने ती यशस्वीपणे पार पाडली, याचा आम्हाला अभिमान आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button