
‘मराठी मुलगी’ तेजस्वी प्रकाशच्या हस्ते लोकार्पण – परंपरा, कारागिरी आणि नव्या सुरुवातींचा उत्सव
पुणे, २१ सप्टेंबर २०२५: संस्कृती आणि कारागिरीचा सुंदर संगम साधत, सेंको गोल्ड अँड डायमंड्सने आपले नवे शोरूम पुण्यात सरसन प्लाझा, लक्ष्मी रोड, नारायण पेठ येथे नवरात्रीच्या पूर्वसंध्येला भव्य सोहळ्यात उद्घाटित केले.
४,५८६ चौ.फुटांमध्ये पसरलेले हे नवे शोरूम सेंकोच्या वाढत्या राष्ट्रीय उपस्थितीचे प्रतीक ठरत असून, पारंपरिक ते आधुनिक अशा सोनं, हिरे आणि प्लॅटिनममधील अनोख्या डिझाइन्सची मोठी श्रेणी ग्राहकांना येथे अनुभवता येईल.
या शोरूमचे लोकार्पण महाराष्ट्राची लेक आणि प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांच्या हस्ते झाले. त्यांच्यासोबत सुवंकर सेन (व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, सेंको गोल्ड अँड डायमंड्स), धवल राजा (मुख्य महाव्यवस्थापक – विक्री) आणि जोइता सेन (संचालिका) उपस्थित होते.
तेजस्वी प्रकाश यांनी सेंकोच्या दागिन्यांमध्ये सजून उद्घाटनप्रसंगी सांगितले,
“सेंको म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा उत्तम संगम. रोजच्या वापरासाठी हलके सोन्याचे दागिने असोत वा समारंभासाठी खास हिर्यांचे सेट्स – प्रत्येक स्त्रीसाठी आणि प्रत्येक क्षणासाठी सेंकोकडे काहीतरी खास आहे.”
सुवंकर सेन यांनी सांगितले,
“पुणेकरांनी आमच्या ब्रँडला दिलेल्या आत्मीयतेबद्दल आम्ही आभारी आहोत. नवरात्रीच्या पूर्वसंध्येला हे शोरूम सुरू करणे आमच्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे, कारण ते विश्वास, वाढ आणि परंपरेचा उत्सव आहे.”
जोइता सेन म्हणाल्या,
“८५ वर्षांच्या परंपरेसह सेंको आज देशभरातील १८५ हून अधिक शोरूम्सपर्यंत पोहोचले आहे. मराठी पिचोदी, पाटल्या यांसारख्या दागिन्यांपासून ते आधुनिक ब्राइडल सेट्स आणि दैनंदिन वापरातील कलेक्शनपर्यंत – आमचे प्रत्येक डिझाइन परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घडवते.”
नवरात्रीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे नवे शोरूम पुणेकरांसाठी खास दागिन्यांचा खजिना ठरणार आहे.