प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्राणप्रतिष्ठा

पुणे : प्रतिनिधी – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जाणारा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा यंदा विशेष ठरणार आहे. प्रसिद्ध प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २७) दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

यापूर्वी ढोल-ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी ८.३० वाजता लाठी-काठी व केशव शंखनादासह मिरवणुकीला सुरुवात होईल. सात ढोल ताशा पथके—श्रीराम पथक, कलावंत, वाद्यवृंद, विश्वगर्जना, स्वयंभूगर्जना, गजर आणि नूमवि—बाप्पाच्या आगमन सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन म्हणाले, “गतवर्षी जया किशोरी यांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भेट दिली असता त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. यंदा हा मान त्यांना मिळणार असून ही गोष्ट आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आहे.”

गतवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाच्या रथाला बैलजोडी न लावता ट्रस्टचे कार्यकर्तेच रथ ओढणार आहेत. प्राणप्रतिष्ठेनंतर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button