चित्रपट, वेब शो आणि आता मालिका! आदिनाथ कोठारेचं छोट्या पडद्यावर पदार्पण

मुंबई : दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आदिनाथ कोठारे आता छोट्या पडद्यावर दिसणार आहे. स्टार प्रवाहवरील नव्या मालिकेतून तो प्रथमच मालिका विश्वात अभिनेता म्हणून पदार्पण करणार आहे.

या मालिकेचं नाव आहे “नशीबवान”, ज्यात आदिनाथ “रुद्रप्रताप घोरपडे” ही महत्वाची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे या मालिकेत तो निर्माता आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका निभावत आहे.

आदिनाथ म्हणतो, “आजवर मी मालिकांसाठी निर्माता-दिग्दर्शक म्हणून काम केले आहे, पण अभिनेता म्हणून ही माझी पहिली मालिका आहे. चित्रपट आणि ओटीटीवर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, पण आता रोज प्रेक्षकांसमोर अभिनेता म्हणून येणं ही एक नशीबवान संधी आहे.”

चित्रपट, वेब शो आणि आता मालिका अशा तिन्ही माध्यमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आदिनाथ कोठारेची एनर्जी आणि मेहनत पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button