पुणेकरांसमोर उलगडली जगातील सर्वात उंच चिनाब ब्रिजची जन्मकथा

पुणे : जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर उभारण्यात आलेला चिनाब ब्रिज हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असून देशाचा अभिमान ठरला आहे. ३५९ मीटर उंची आणि १३१५ मीटर लांबी असलेल्या या पुलाची अभियांत्रिकी कथा पुणेकरांसमोर प्रथमच उलगडली.

प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन (PSEA) तर्फे तसेच अल्ट्रा टेक, बीएनसीए, ICI, AESA, IGS यांच्या सहआयोजनातून कर्वेनगर, पुणे येथे या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या वेळी पूल उभारणीतील तांत्रिक अडचणी, आव्हाने, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि अभियंत्यांच्या प्रयत्नांची सविस्तर माहिती देण्यात आली.

पुलाची वैशिष्ट्ये

  • ३५९ मीटर उंची – जगातील सर्वात उंच रेल्वे पूल
  • १३१५ मीटर लांबी
  • ताशी २६६ किमी वेगाने येणारे वारे सहन करण्याची क्षमता
  • बांधकामाला सुरुवात : २००४
  • पूर्णता : कोविड काळातील अडचणींवर मात करून

या परिसंवादात अभियंते विकास रामगुडे, डॉ. सुनील बसारकर, शशांक राजभोज आदी मान्यवरांनी आपले अनुभव मांडले. “चिनाब ब्रिज हा केवळ पूल नाही तर भारतीय अभियंता कौशल्याचे प्रतीक आहे” असे तज्ज्ञांनी नमूद केले.

पुण्यातील वरिष्ठ प्रॉजेक्ट मॅनेजर्स, बांधकाम व्यावसायिक, विद्यार्थी आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button