वृद्ध रुग्णास हृदयाचे नवे बळ, दर्जेदार जीवनाची नवी सुरुवात
पुणे, सप्टेंबर २०२५: मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे येथे अत्यंत उच्च-धोका असलेल्या एका वृद्ध रुग्णावर ट्रान्सकॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व इम्प्लांटेशन (TAVI) ही अत्याधुनिक हृदय झडप प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. या प्रक्रियेमुळे गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाचे जीवन वाचले असून त्यांना पुन्हा दर्जेदार जीवन जगण्याची नवी संधी मिळाली आहे.
एऑर्टिक व्हॉल्व स्टेनोसिसमुळे श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना व थकवा अशी लक्षणे दिसतात. या आजारावर आतापर्यंत उघड्या हृदयाची शस्त्रक्रिया हा मुख्य उपाय होता. मात्र, वयोमान व सहव्याधींमुळे धोका अधिक असल्याने तज्ज्ञ डॉक्टरांनी पर्याय म्हणून TAVI प्रक्रिया निवडली.
ही प्रक्रिया फेमोरल आर्टरीमार्गे कॅथेटरच्या सहाय्याने करण्यात आली. डॉ. सोनम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. रुग्णाला २४ तासांत चालण्यास सुरुवात झाली आणि चौथ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला.
डॉ. सोनम शिंदे म्हणाले, “TAVI प्रक्रियेमुळे उच्च-धोका असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेविना सुरक्षित उपचार देणे शक्य झाले आहे. ही खरोखरच क्रांतिकारी पद्धत आहे.”
डॉ. प्रशांत शिंदे यांनी सांगितले, “ही शस्त्रक्रिया म्हणजे टीमवर्क आणि अचूकतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. रुग्ण लवकर बरे झाले, हे आमच्यासाठी मोठे समाधान आहे.”
ही कामगिरी मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व गुणवत्तापूर्ण रुग्णसेवेच्या बांधिलकीचे उदाहरण ठरली आहे.