५०९ चौक ते धानोरी डीपी रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी

पुणे, दि. _ : ५०९ चौक ते धानोरी परिसरातील प्रस्तावित डीपी रस्त्याच्या कामाची आज सकाळी Sunil Anna Tingre यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान रस्त्याच्या कामाची प्रगती, येणाऱ्या अडचणी आणि पुढील कार्यवाही यांचा सखोल आढावा घेण्यात आला.

यावेळी आमदार टिंगरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. या रस्त्याबाबत यापूर्वी Pune Municipal Corporation च्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

प्रत्यक्ष पाहणीदरम्यान जागा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेमधील अडचणी, प्रशासकीय बाबी तसेच प्रलंबित मुद्द्यांवर अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत Sanjay Dharav, प्रशांत मोरे, पौर्णिमा गायकवाड, सुशिल मोहिते, सुनिल पोहोफळे, अक्षय मोडवे आणि निजानंद खामकर आदी अधिकारी उपस्थित होते.

सदर डीपी रस्ता हा नागरिकांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, तो लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button