गल्ली नं. १३’ चित्रपटाचे उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन आशय आणि वेगळ्या कथा घेऊन येणाऱ्या सिनेमांची परंपरा कायम ठेवत ‘गल्ली नं. १३’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून, त्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

या पोस्टर प्रदर्शन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. निर्माते रामनाथ बोडके आणि राजश्री बडगुजर यांच्या ‘RB Cinematics’तर्फे, तसेच Pickle Entertainment यांच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन, पटकथा आणि संवादलेखन Mahendra Ramabhau Borkar यांनी केले आहे. त्यांनी यापूर्वी मराठी व हिंदी मालिकांसाठी लेखन केले असून, त्यांच्या ‘Beautifying Relations’ या पुस्तकाला गोल्डन बुक पुरस्कार प्राप्त झाला आहे.

पोस्टरमध्ये नायक पाठमोरा उभा असून, त्याच्या मागे वीज पडल्याचा प्रभाव दाखवण्यात आला आहे. शहराच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले हे पोस्टर गूढ आणि उत्कंठा निर्माण करणारे आहे. चित्रपटाची कथा तरुणाईभोवती फिरणारी असून, त्यात कुटुंबव्यवस्था, प्रेम आणि समाजातील बदलत्या मूल्यांचा वेध घेण्यात येणार आहे.

या चित्रपटाची कथा Dr. S. D. Patil यांची असून संगीत Rohit Nagbhid देणार आहेत. नृत्य दिग्दर्शन प्रज्ञा पाटील करणार असून पोस्ट प्रॉडक्शनची जबाबदारी एपीएच स्टुडिओकडे आहे.

मनोरंजन, भावना आणि वास्तव यांचा संगम असलेला ‘गल्ली नं. १३’ हा सिनेमा प्रेक्षकांना हसवेल, रडवेल आणि त्यांच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणींना उजाळा देईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. सध्या चित्रपटासाठी कलाकारांची निवड सुरू असून, लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button