जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

पुणे, दि. २६ : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत प्रजासत्ताक दिनाचा उत्साहपूर्ण वातावरणात सोहळा पार पडला.

या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रध्वज वंदनानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत संविधानातील मूल्ये जपण्याचे आवाहन केले. शिस्त, एकता आणि लोकशाही मूल्यांचे पालन करून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button