
पुणे : पुणे शहरात NSUI (नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया) च्या माध्यमातून जिल्हास्तरीय कराटे स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन मा. मोहन दादा जोशी (प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस कमिटी महाराष्ट्र), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते रेनौल्ट डीसूजा आणि अक्षय कांबळे (प्रदेश उपाध्यक्ष, NSUI) यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेचे आयोजन साहेबराव क्षीरसागर (महासचिव, NSUI पुणे) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. स्पर्धेचे उत्कृष्ट व्यवस्थापन सिद्धांत जांभुळकर (जिल्हा उपाध्यक्ष, NSUI पुणे) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. तसेच स्पर्धेची शिस्तबद्ध आखणी आणि अंमलबजावणी सुशांत दसाडे व रविराज कांबळे (महासचिव, NSUI पुणे) यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या करण्यात आली.
स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. युवकांमध्ये स्वरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी NSUI च्या माध्यमातून करण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.
यावेळी मोहन दादा जोशी यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांना पारितोषिके प्रदान केली तसेच भविष्यात NSUI ने राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आयोजित कराव्यात, असे प्रोत्साहन दिले.