ज्ञानमंदिर कळंबोली शाळेने पटकावले ‘मएसो क्रीडा करंडक २०२६’चे विजेतेपद

पुणे : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) क्रीडावर्धिनी आणि कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मएसो क्रीडा करंडक २०२६’ या राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मएसो ज्ञानमंदिर कळंबोली या शाळेने पटकावले. यासह फिरत्या करंडकाचीही मानकरी ठरली. या स्पर्धेचे हे १४ वे वर्ष होते.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही तीन दिवसीय निवासी क्रीडा स्पर्धा बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड येथे पार पडली. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तेजल हसबनीस यांच्या हस्ते रविवारी झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मएसोचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक होते.यावेळी मएसो नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, क्रीडावर्धिनी व शाला समितीचे अध्यक्ष विजय भालेराव, सचिव अतुल कुलकर्णी, सहसचिव सुधीर भोसले, शाला समिती महामात्र डॉ. नेहा देशपांडे, मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी, मंजुषा दुर्वे, सायली देशमुख यांच्यासह संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते.तेजल हसबनीस म्हणाल्या, “लहान वयापासून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडासंस्कृती रुजवण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. संघभावना, शिस्त, आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्ती विकसित होण्यासाठी खेळ मोठी भूमिका बजावतो.”अध्यक्षीय मनोगतात प्रदीप नाईक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, “भविष्यात याच विद्यार्थ्यांपैकी काही ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील,” असा विश्वास व्यक्त केला. पुढील वर्षीचा ‘मएसो क्रीडा करंडक’ पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके महाविद्यालयात आयोजित केला जाईल, अशी घोषणा विजय भालेराव यांनी केली.स्वागत-प्रास्ताविक बाबासाहेब शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वैशाली कुलकर्णी, तर आभार प्रदर्शन मंजुषा दुर्वे यांनी केले. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या शिक्षिका व क्रीडाशिक्षकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.🥇 स्पर्धेतील विजेतेया स्पर्धेत मुले व मुली गटांत सूर्यनमस्कार, लंगडी, डॉजबॉल आणि गोल खो-खो या सांघिक मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सांघिक व वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.सूर्यनमस्कारमुले : ज्ञानमंदिर कळंबोली, पब्लिक स्कूल कळंबोली, दामोदर शंकर रेणावीकर विद्यामंदिर (अहिल्यानगर)मुली : ज्ञानमंदिर कळंबोली, पब्लिक स्कूल कळंबोली, बालविकास मंदिर सासवडलंगडीमुले : निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, इंग्लिश मिडीयम स्कूल शिरवळ, ह. ग. देशपांडे बारामतीमुली : इंग्लिश मिडीयम स्कूल शिरवळ, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, विद्यामंदिर बेलापूरडॉजबॉलमुले : विद्यामंदिर बेलापूर, ज्ञानमंदिर कळंबोली, निर्मला देशपांडे विद्यालय बारामतीमुली : बालविकास मंदिर सासवड, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, इंग्लिश मिडीयम स्कूल शिरवळगोल खो-खोमुले : निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, ज्ञानमंदिर कळंबोली, इंग्लिश मिडीयम स्कूल शिरवळमुली : ज्ञानमंदिर कळंबोली, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, बालविकास मंदिर सासवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button