मंडई उजळली; अवघ्या तीन दिवसांत नवी प्रकाशव्यवस्था

पुणे : पुण्याच्या मध्यवस्तीतील ऐतिहासिक व मुख्य बाजारपेठ असलेल्या महात्मा फुले मंडईत अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या अडचणी अवघ्या तीन दिवसांत दूर करण्यात आल्या आहेत. नवनिर्वाचित नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी केलेल्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे मंडईत ५० नवे विद्युत दिवे बसवण्यात आले असून, आता संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे.१३५ वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेल्या महात्मा फुले मंडईत अनेक दिवसांपासून जुने व नादुरुस्त विद्युत दिवे, तसेच कमी क्षमतेच्या प्रकाशामुळे व्यापारी व नागरिकांना सायंकाळच्या वेळेस अडचणींचा सामना करावा लागत होता. काही दिवसांपूर्वी नगरसेवक मानकर यांनी मंडईला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी प्रकाश व्यवस्थेची गंभीर समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली.समस्या लक्षात घेताच तातडीने उपाययोजना करत तीन दिवसांत जुने दिवे बदलून ५० नवीन विद्युत दिवे बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले. आज नगरसेवक मानकर यांनी मंडईला पुन्हा भेट देऊन कामाची पाहणी केली.यावेळी बोलताना मानकर म्हणाले, “व्यापारी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेशी प्रकाश व्यवस्था अत्यंत गरजेची आहे. तातडीची गरज लक्षात घेऊन हे काम पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच संपूर्ण मंडई परिसरातील विद्युत व्यवस्थेचे नूतनीकरण करण्यात येईल. मंडईतील इतर समस्यांबाबतही आम्ही कटिबद्ध आहोत.”व्यापाऱ्यांनीही समाधान व्यक्त करत सांगितले की, “अपुऱ्या प्रकाशामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. नगरसेवक बाप्पु मानकर यांनी तत्काळ दखल घेत वेगाने काम पूर्ण केले. त्यांच्या तत्परतेबद्दल आम्ही आभारी आहोत.”यावेळी नागरिक व व्यापाऱ्यांनी मानकर यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button