
पुणे : प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज विविध सोसायट्यांमध्ये व्यापक जनसंवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. गायत्री मेढे-कोकाटे, श्री. बाबुराव चांदेरे, सौ. पार्वती निम्हण आणि श्री. अमोल बालवडकर यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या.
सोसायटी भेटीदरम्यान नागरिकांनी आतापर्यंत प्रभागात करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती दिली. तसेच भविष्यात राबविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, पार्किंग आणि सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांनी मांडलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्या प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी ठोस कृती आराखडा राबवण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.
या जनसंवाद दौऱ्यात ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तसेच स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वास आणि सकारात्मक प्रतिसादाबद्दल उमेदवारांनी आभार मानले. आगामी काळातही सोसायटी-स्तरावर नियमित संवाद, फीडबॅक मीटिंग्स आणि समस्या निवारणासाठी सातत्याने संपर्क ठेवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.