प्रभाग २४ अधिक सुरक्षित : गणेश बिडकर यांच्या दूरदृष्टीमुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मजबूत सुरक्षा कवच

पुणे दि 8 : प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या भाजपचे अधिकृत उमेदवार गणेश बिडकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सोमवार पेठ परिसरात महापालिकेच्या निधीतून तब्बल १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. या आधुनिक सुरक्षा यंत्रणेमुळे गुन्हेगारांवर प्रभावी वचक बसला असून संपूर्ण प्रभागाची सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम झाली आहे.प्रचारादरम्यान प्रभागातील नागरिकांकडून या सीसीटीव्ही यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल या मध्यवर्ती भागातील २४ प्रमुख चौक, ६० मोक्याची ठिकाणे, महत्त्वाच्या शाळा, रुग्णालये, एटीएम, बस थांबे अशा गर्दीच्या ठिकाणांची काळजीपूर्वक निवड करून हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत.या उपक्रमामुळे समर्थ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ८० टक्के परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली आला आहे. परिणामी पोलिसांना गर्दीवर सतत लक्ष ठेवणे सुलभ झाले असून पोलिस यंत्रणेवरील ताणही लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.पेठांचा हा परिसर पालखी सोहळा, गणेशोत्सव तसेच विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांच्या काळात मोठ्या प्रमाणावर गजबजलेला असतो. अशा वेळी ही प्रगत सीसीटीव्ही यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.यासंदर्भात बोलताना गणेश बिडकर म्हणाले,“प्रभागातील नागरिक दहशतमुक्त वातावरणात सुरक्षितपणे जीवन जगावेत, हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. भविष्यात आणखी अत्याधुनिक सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”प्रभाग २४ मध्ये राबविण्यात आलेले हे ‘बिडकर मॉडेल’ आता सुरक्षित प्रभागाचे आदर्श उदाहरण ठरत असून त्याची शहरभर चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button