सनी निम्हण यांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; औंध–बोपोडीत प्रचाराला गती

पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर वाढला असून औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार सनी विनायक निम्हण यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या वतीने आज बोपोडी परिसरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.या पदयात्रेत प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.सकाळच्या सत्रात औंध येथील सानेवाडी आय.टी.आय. रोड परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. तर सायंकाळी बोपोडीतील मानाजी बाग, भोईटे वस्ती परिसरात प्रचार करण्यात आला.या वेळी मूलभूत विकासकामे, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता तसेच नागरी समस्या यांवर भर देत उमेदवारांनी आपल्या विकासात्मक भूमिकेची माहिती मतदारांना दिली. पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत आपल्या समस्या, अपेक्षा आणि सूचना मांडल्या.या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून प्रभागातील जनतेशी थेट संवाद साधण्याचा उपक्रम यशस्वी ठरल्याचे चित्र दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button