भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; नाशिक येथे ‘सीडीएस-६६’ पूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम

पुणे, दि. ५ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. ‘संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा’ (CDS) तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे १९ जानेवारी ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘सीडीएस अभ्यासक्रम क्रमांक ६६’ आयोजित करण्यात येणार आहे.

या अभ्यासक्रमाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी १८ जानेवारी २०२६ पर्यंत आपल्या संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुलाखतीस येताना उमेदवारांनी www.mahasainik.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले सीडीएस-६६ अभ्यासक्रमाचे प्रवेशपत्र किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आलेले प्रवेशपत्र तसेच त्यासोबतची परिशिष्टे तीन प्रतींमध्ये भरून सादर करणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षण कालावधीत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजनाची सुविधा पुरविण्यात येणार आहे.

या अभ्यासक्रमासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असून केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेण्यात येणाऱ्या CDS परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला असणे बंधनकारक आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी
training.pctcnashik@gmail.com

०२५३-२४५१०३२
९१५६०७३३०६ (WhatsApp)
या क्रमांकांवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button