
पुणे दि. 1 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजय स्तंभास भेट देऊन अभिवादन केले. कोरेगाव भीमा युद्धातील शूरवीरांच्या शौर्याची आठवण जपणाऱ्या या विजय स्तंभावर त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनील वारे, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विजय स्तंभ हा सामाजिक समतेच्या संघर्षाचे प्रतीक असून त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.