बारामतीत ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे भव्य उद्घाटन; गौतम अदानी व शरद पवार यांची उपस्थिती

बारामती दि. 28 : विद्या प्रतिष्ठानच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक एआय सेंटरचे उद्घाटन आज अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्री. गौतमजी अदानी यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते आदरणीय श्री. शरद पवार साहेब यांनी भूषवले. या विशेष प्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले.

१९७२ च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण आणि कृषी क्षेत्र मजबूत करण्यासाठी कृषी विकास प्रतिष्ठान आणि विद्या प्रतिष्ठान या संस्थांची स्थापना करण्यात आली. त्या काळात केवळ लिहिता-वाचता येणं म्हणजे साक्षरता मानली जात होती; मात्र आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चे ज्ञान असलेला विद्यार्थीच खऱ्या अर्थाने साक्षर ठरेल, अशी गरज निर्माण झाली आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

काळाची गरज ओळखून विद्या प्रतिष्ठानने सातत्याने दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण देण्यावर भर दिला आहे. शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे केंद्र त्या कार्यात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, ग्रामीण भागातील मुला-मुलींना नव्या युगातील संधी उपलब्ध करून देणार आहे. हे केंद्र खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी भविष्याची दारे उघडणारे ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

बारामतीच्या विकासात भर घालणारी प्रत्येक गोष्ट बारामतीकरांच्या हिताची असावी, ही भूमिका कायम राहिली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, AI, संशोधन आणि कौशल्य विकास यांचा योग्य संगम साधत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळावी, यासाठी विद्या प्रतिष्ठानने देशपातळीवर दिशादर्शक पाऊल उचलले आहे.

आज बारामतीतील मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, शारदानगर आणि विद्या प्रतिष्ठानच्या विविध शैक्षणिक संकुलांमध्ये एक लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उपलब्ध सुविधांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी बारामतीत दाखल होत असून, पुण्यानंतर ग्रामीण भागात बारामती एक शैक्षणिक हब म्हणून नावारूपाला येत आहे.

याच वाटचालीत नर्सिंग कॉलेजला मंजुरी मिळाली असून इमारतीचा आराखडाही मंजूर झाला आहे. त्याच परिसरात भविष्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणारी आणि बारामतीचा नावलौकिक वाढवणारी ही विकासयात्रा अधिक वेगाने पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. : विद्या प्रतिष्ठानच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक एआय सेंटरचे उद्घाटन आज अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्री. गौतमजी अदानी यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते आदरणीय श्री. शरद पवार साहेब यांनी भूषवले. या विशेष प्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले.

१९७२ च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण आणि कृषी क्षेत्र मजबूत करण्यासाठी कृषी विकास प्रतिष्ठान आणि विद्या प्रतिष्ठान या संस्थांची स्थापना करण्यात आली. त्या काळात केवळ लिहिता-वाचता येणं म्हणजे साक्षरता मानली जात होती; मात्र आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चे ज्ञान असलेला विद्यार्थीच खऱ्या अर्थाने साक्षर ठरेल, अशी गरज निर्माण झाली आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

काळाची गरज ओळखून विद्या प्रतिष्ठानने सातत्याने दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण देण्यावर भर दिला आहे. शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे केंद्र त्या कार्यात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, ग्रामीण भागातील मुला-मुलींना नव्या युगातील संधी उपलब्ध करून देणार आहे. हे केंद्र खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी भविष्याची दारे उघडणारे ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

बारामतीच्या विकासात भर घालणारी प्रत्येक गोष्ट बारामतीकरांच्या हिताची असावी, ही भूमिका कायम राहिली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, AI, संशोधन आणि कौशल्य विकास यांचा योग्य संगम साधत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळावी, यासाठी विद्या प्रतिष्ठानने देशपातळीवर दिशादर्शक पाऊल उचलले आहे.

आज बारामतीतील मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, शारदानगर आणि विद्या प्रतिष्ठानच्या विविध शैक्षणिक संकुलांमध्ये एक लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उपलब्ध सुविधांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी बारामतीत दाखल होत असून, पुण्यानंतर ग्रामीण भागात बारामती एक शैक्षणिक हब म्हणून नावारूपाला येत आहे.

याच वाटचालीत नर्सिंग कॉलेजला मंजुरी मिळाली असून इमारतीचा आराखडाही मंजूर झाला आहे. त्याच परिसरात भविष्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणारी आणि बारामतीचा नावलौकिक वाढवणारी ही विकासयात्रा अधिक वेगाने पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button