
चिंचवड: शिक्षण क्षेत्रातील मूल्याधिष्ठित, नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थीकेंद्रित कार्याची दखल घेत प्राचार्य विठ्ठल बबनराव गायकवाड यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. स्विफ्ट निफ्ट मीडिया ग्रुप यांच्या वतीने हा सन्मान एल्प्रो मॉल सभागृह, चिंचवड येथे २१ डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार नवनाथ येवले (येवले ग्रुप) व निलेश साबे (स्विफ्ट अँड लिफ्टचे सीईओ) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्राचार्य गायकवाड यांना यापूर्वीही शिक्षण रत्न आणि उत्कृष्ट प्राचार्य कार्य गौरव – राष्ट्रीय पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवत मूल्यशिक्षण, शिस्त, सामाजिक जाणीव आणि आधुनिक अध्यापन पद्धती यांचा समतोल साधणारे त्यांचे कार्य शिक्षण क्षेत्रात आदर्श ठरत आहे. शिक्षण केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या
व्यक्तिमत्त्व विकासावर, जबाबदारीची जाणीव आणि सकारात्मक जीवनदृष्टी घडविण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.
शैक्षणिक गुणवत्तेसोबतच संस्कार, नेतृत्वगुण आणि सामाजिक भान निर्माण करण्यासाठी राबविलेले उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणारे ठरले आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण योगदानाची पोचपावती म्हणून हा राज्यस्तरीय सन्मान देण्यात आल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.या गौरवाबद्दल ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी चे सन्माननीय चेअरमन सागर ढोले पाटील यांनी प्राचार्य गायकवाड यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.