
पुणे, दि19 : मोबाईल, टॅब्लेट, टीव्ही आणि संगणक यांसारख्या डिजिटल उपकरणांचा वापर आज मुलांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे. मात्र हा स्क्रीन टाइम मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि भाषिक विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत.
मुलांचा स्क्रीन टाइम म्हणजे काय?
मुलं फोन, टॅब्लेट, टीव्ही किंवा संगणकावर जेवढा वेळ घालवतात, तो म्हणजे स्क्रीन टाइम. योग्य प्रमाणात वापर फायदेशीर ठरू शकतो; पण अतिरेक केल्यास तो धोकादायक ठरतो.
स्क्रीन टाइमचे तोटे
शारीरिक आरोग्यावर परिणाम
लठ्ठपणा वाढण्याचा धोका
डोळे कोरडे होणे, डोकेदुखी
शारीरिक हालचाल कमी होणे
मानसिक व भावनिक परिणाम
लक्ष केंद्रित करण्याची क्षमता घटते
चिडचिडेपणा वाढतो
झोपेच्या समस्या निर्माण होतात
विकासावर परिणाम
भाषा विकास मंदावतो
सामाजिक संवादाच्या संधी कमी होतात
स्क्रीन टाइमसाठी मार्गदर्शक तत्त्वे
2 वर्षांखालील मुले : स्क्रीन टाइम पूर्णपणे टाळावा (World Health Organization शिफारस)
2 ते 5 वर्षे : दररोज जास्तीत जास्त १ तास (American Academy of Pediatrics)
6 वर्षांनंतर : १ ते २ तास, तोही गुणवत्तापूर्ण कंटेंटसह
स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी उपयुक्त टिप्स
नियम बनवा : कुटुंबासाठी स्पष्ट स्क्रीन टाइम नियम ठरवा
वेळेचे बंधन : जेवताना आणि झोपण्यापूर्वी किमान १ तास स्क्रीन टाळा
पर्यायी उपक्रम : खेळ, चित्रकला, वाचन, कोडी सोडवणे याकडे मुलांचा कल वळवा
गुणवत्तेवर लक्ष : शैक्षणिक व माहितीपूर्ण कंटेंटलाच प्राधान्य द्या
स्क्रीन फ्री डे : आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे स्क्रीनपासून दूर ठेवा
मुलांशी संवाद : मोठ्या मुलांशी चर्चा करून नियम ठरवा
तज्ज्ञांच्या मते, मुलांना फोन देण्याचं योग्य वय ठरवताना त्यांच्या मानसिक परिपक्वतेचा आणि गरजेचा विचार करणं महत्त्वाचं आहे. पालकांनीच आदर्श ठेवला, तर मुलांमध्येही संतुलित डिजिटल सवयी विकसित होतील.