महिनाभर साखर टाळल्यास तब्येतीत सकारात्मक बदल; ऊर्जा, त्वचा आणि झोपेवर दिसतो फायदा

पुणे दि. 11  : : आरोग्य जपण्यासाठी अनेकजण आहारामध्ये बदल करत आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे साखरेचे सेवन कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे. तज्ज्ञांच्या मते, फक्त महिनाभर रिफाइंड साखर न खाल्ल्यास शरीरात काही मोठे आणि सकारात्मक बदल दिसू लागतात. हे बदल आरोग्य सुधारण्यास महत्त्वाची मदत करतात.

साखर टाळल्यावर सर्वात मोठा फायदा उर्जेमध्ये स्थिरता दिसून येतो. रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढणे-घटणे कमी होत असल्याने दिवसभर थकवा कमी जाणवतो. यामुळे कार्यक्षमता देखील वाढते.

वजन कमी करण्यासाठीही साखर टाळणे उपयोगी ठरते. कॅलरीचे प्रमाण कमी होत असल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच पिंपल्स कमी होणे, त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसणे हे देखील अनेकांना जाणवलेले बदल आहेत.

साखर कमी केल्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. मेंदू कमी उत्तेजित राहतो आणि रात्री झोप लवकर लागत असल्याचे आरोग्यतज्ञ सांगतात. पोटाचे आरोग्य सुधारणे, गॅस आणि फुगणे कमी होणे, चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होत राहणे हेही फायदे दिसून येतात.

तज्ज्ञांच्या मते साखर दाह वाढवते. त्यामुळे महिनाभर साखर टाळल्यास प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि सूज कमी होते. ब्रेन फॉग कमी होऊन एकाग्रता, मूड आणि मानसिक स्पष्टतेतही वाढ जाणवते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासही हा बदल उपयुक्त ठरतो.

तथापि, साखर अचानक बंद केल्यावर पहिले ३ ते ५ दिवस थकवा, डोकेदुखी, चिडचिड किंवा गोड खाण्याची इच्छा जाणवू शकते. ही लक्षणे काही दिवसांत आपोआप कमी होतात.एकूणच, महिनाभर साखर न खाल्ल्यास शरीर अधिक निरोगी, ऊर्जावान आणि तंदुरुस्त राहते, असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button