विमानतळ रस्ता होणार कोंडीमुक्त; रुंदीकरणासह सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा

पुणे : लोहगाव विमानतळाकडे जाणाऱ्या नागपूर चाळ ते विमानतळ प्रवेशद्वार या महत्त्वाच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार असून, लवकरच हे काम सुरू होणार आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) विकसित होणाऱ्या या प्रकल्पामुळे विमानतळ रस्ता वाहतूककोंडीमुक्त होणार असून, प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्याचा आनंद मिळणार आहे, अशी माहिती पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

सध्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज २०० ते २२५ उड्डाणे होत असून वार्षिक प्रवासीसंख्येने एक कोटींचा टप्पा ओलांडला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता सध्याचा १२ मीटरचा रस्ता २४ मीटरपर्यंत रुंद केला जाणार आहे.

मोहोळ यांच्या संकल्पनेनुसार हा रस्ता केवळ रुंदच नाही तर जगण्यालायक सौंदर्यपूर्ण करण्यात येणार आहे. शहराचा प्राचीन वारसा, कला, परंपरा आणि संस्कृती यांचे दर्शन देणारा आकर्षक मार्ग म्हणून त्याची उभारणी होणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, विमानतळ संचालक संतोष ढोके आणि हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन कुलदीप सिंग यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

दीर्घकाळ रखडलेला हवाई दलाचा ताबा व खाजगी जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यात मोहोळ यशस्वी झाले असून नागपूर चाळ ते विमानतळ या तीन किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाला मंजुरी मिळाली आहे.

रस्त्याच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये समावेश

रस्ता १२ मीटरवरून २४ मीटर रुंद

पादचारी मार्ग, शोभिवंत झाडे, कारंजी, विद्युत रोषणाई

नागरिक व प्रवाशांसाठी आकर्षक बसण्याची व्यवस्था

चित्र व शिल्पांच्या माध्यमातून पुण्याच्या गौरवशाली वारशाचे दर्शन

कला, संस्कृती, परंपरा यांचे मनोहारी प्रदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button