महाराष्ट्रात १ ते ३ डिसेंबर मद्यविक्री बंद; स्थानिक निवडणुकांसाठी कडक बंदोबस्त

पुणे दि. 30 : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे १, २ आणि ३ डिसेंबर २०२५ या तीन दिवसांत संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांमध्ये मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
यामध्ये बार, वाइन शॉप, बिअर शॉपी, देशी-विदेशी दारू दुकाने तसेच सर्व माडी विक्री परवानाधारकांचा समावेश आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ डिसेंबर (मतदानाच्या आदला दिवस), २ डिसेंबर (मतदानाचा दिवस) आणि ३ डिसेंबर (मतमोजणीचा दिवस) या सर्व दिवशी संबंधित निवडणूक क्षेत्रांमध्ये संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद राहील. काही जिल्ह्यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ३ डिसेंबरला दारूबंदी लागू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

२ डिसेंबरला मतदान होणारी नगरपरिषद व नगरपंचायती
पालघर

डहाणू, जव्हार, पालघर, वाडा

रायगड

अलिबाग, कर्जत, खोपोली, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पणे, रोहा, श्रीवर्धन, उरण

रत्नागिरी

चिपळून, देवरुख, गुहागर, खेड, लांजा, राजापूर, रत्नागिरी

सिंधुदुर्ग

कणकवली, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला

ठाणे

अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर

अहिल्यानगर

देवळाली प्रवरा, जामखेड, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, राहता, राहुरी

धुळे

दोंडाईचा-वरवाडे, पिंपळनेर, सिंदखेडा, शिरपूर-वरवाडे

जळगाव

जामनेर, अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर, नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, शेंदूणी, वरणगाव, यावल

नंदूरबार

शहादा, नंदूरबार, नवापूर, तळोदा

नाशिक

भगूर, मनमाड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, चांदगाव, इगतपुरी, ओझर

कोल्हापूर

आजरा, चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ, वडगाव

पुणे

आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, मालेगाव बु., मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरुर, तळेगाव-दाभाडे, वडगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button