पुणे गृहनिर्माण मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली

पुणे, दि. २० : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (MHADA) विविध गृहनिर्माण योजनांसाठी ११ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांच्या मागणीवरून ती २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली होती.

मात्र, अनेक नागरिकांकडून अद्याप कागदपत्रांची पूर्तता, प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे आणखी मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढती मागणी लक्षात घेता पुणे गृहनिर्माण मंडळाने अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

११ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या मूळ जाहिरातीतील इतर सर्व अटी व नियम पूर्ववत राहतील, अशी माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी राहूल साकोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button