अमोल मिटकरींना पुन्हा महत्त्वाची जबाबदारी; अजित पवारांकडून स्टार प्रचारकपदाची नेमणूक

पुणे दि. 13 : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्तेपदावरून काही दिवसांपूर्वीच वगळण्यात आले होते. मात्र, अवघ्या तीन दिवसांतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिटकरींवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अमोल मिटकरी आणि माजी मंत्री धनंजय मुंडे या दोघांनाही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमधील पक्षांमध्ये मतभेद निर्माण होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळेच त्यांना प्रवक्तेपदावरून मुक्त केल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता पक्षाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत प्रचारातील जबाबदारी सोपवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button