कर्जमुक्त कंट्री क्लबचा नवा अध्याय — आनंद, संगीत आणि शैलीचा उत्सव

भारताच्या मनोरंजन आणि लाइफस्टाईल क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या कंट्री क्लब हॉस्पिटॅलिटी अँड हॉलिडेज लिमिटेड (CCHHL) ने आपल्या प्रवासात ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. तब्बल ₹६०० कोटींच्या कर्जातून मुक्त होत कंपनीने स्वतःला ‘झिरो डेट संस्था’ म्हणून घोषित केले आहे. या आर्थिक स्थैर्यामुळे कंपनी आता देशभरातील फ्रँचायझी विस्तार सुरू करणार आहे.

या नव्या पर्वाची सांगता करत कंट्री क्लबने ‘WAR OF DJ’s’ या थीमवर आधारित भव्य नववर्ष सोहळ्याची घोषणा केली आहे. हा सोहळा ३१ डिसेंबर २०२५ रोजी पुण्यातील उंद्री येथील कंट्री क्लबमध्ये तसेच देशभरातील शाखांमध्ये एकाच वेळी साजरा होणार आहे. देशातील नामांकित DJs, लाईव्ह बँड्स आणि डान्स ट्रूप्स या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रेक्षकांना अनोखा मनोरंजन अनुभव देतील.

कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रेड्डी म्हणाले, “कंट्री क्लबचा प्रत्येक उत्सव हा आनंद, एकता आणि परिवाराचे प्रतीक असतो. आमचे सदस्य हा सोहळा अविस्मरणीय क्षणात रुपांतरित करतील.”

कंट्री क्लबने अलीकडेच पुण्यातील वन8 कम्यून (One8 Commune) सोबत भागीदारी केली असून, या माध्यमातून फाईन डायनिंग, प्रीमियम इव्हेंट्स आणि क्लब संस्कृतीचा संगम साधला जाणार आहे.

१९८९ मध्ये स्थापन झालेला कंट्री क्लब आज दोन दशलक्ष सभासदांसहHappiness as a Service’ या ध्येयवाक्याने पुढे जात आहे. हा प्रवास केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता आनंदाच्या जीवनशैलीचे प्रतीक बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button