लाल महाल चौकात ३१ सार्वजनिक गणेश मंडळांची संयुक्त दहीहंडी

पुणे : प्रतिनिधी — पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एकत्र आणत पुनीत बालन ग्रुपच्या वतीने यंदाही डीजेमुक्त दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक लाल महाल चौकात होणाऱ्या या संयुक्त दहीहंडी सोहळ्यात पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे, हलगी, मर्दानी खेळ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. यंदा तब्बल ३१ गणेश मंडळे या संयुक्त दहीहंडीत सहभागी होणार असल्याची माहिती पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील ऐतिहासिक लाल महाल चौकात हा संयुक्त दहीहंडी सोहळा रंगणार आहे. पुनीत बालन ग्रुपने गेल्या दोन वर्षांपासून संयुक्त दहीहंडी उत्सवाची सुरुवात केली आहे. गतवर्षी ग्रुपच्या वतीने डीजेमुक्त दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दहीहंडी आणि गणेशोत्सव पारंपरिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची भूमिका ग्रुपकडून सातत्याने मांडण्यात येत आहे.

यंदाच्या सोहळ्याला मोठा प्रतिसाद मिळत असून ३१ गणेश मंडळे संयुक्त दहीहंडीत सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ३ वाजता प्रभात बँडच्या वादनाने होणार आहे. त्यानंतर मानवंदना देण्यात येईल. पुढे रमणबाग तेजस्विनी, पखवाज-टाळ, शिवाद्य, गजर, हलगी वादन, मर्दानी खेळ, आवर्तन, समर्थ, शिवमुद्रा आणि अष्टविनायक या पथकांकडून विविध सादरीकरणे होणार आहेत.

‘उत्सवाचा आनंद डीजेशिवायही घेता येतो’

“दहीहंडी आणि गणेशोत्सव हे आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा भाग आहेत. मोठ्या आवाजाच्या डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे, हलगी, मर्दानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही या उत्सवांचा तितक्याच उत्साहाने आनंद घेता येतो. गतवर्षी सुरू केलेल्या डीजेमुक्त दहीहंडी उपक्रमाला यंदा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दोनशेहून अधिक गणेश मंडळांनी डीजे न लावण्याचा घेतलेला निर्णय सकारात्मक आणि स्वागतार्ह आहे. पुण्यातील उत्सव अधिक पारंपरिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे व्हावेत, हा आमचा प्रयत्न आहे,” असे पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप यांनी सांगितले.

संयुक्त दहीहंडीत सहभागी होणारी गणेश मंडळे

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, श्रीमंत पेशवे गणेश मंदिर, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुण्येश्वर महादेव मंदिर उत्सव समिती, श्री गरुड गणपती (लक्ष्मी रोड), उदय तरुण मंडळ ट्रस्ट (एफ.सी. रोड), नागनाथपार सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट, मुंजोबा तरुण मंडळ (पी.एम.सी.), फणी आळी तालीम ट्रस्ट, प्रकाश मित्र मंडळ, भरत मित्र मंडळ, आझाद हिंद मंडळ (जे.एम. रोड), व्यवहार आळी चौक मित्र मंडळ ट्रस्ट, त्वष्टा कासार समाज संस्था, श्रीराम अभिमन्यू मंडळ पुणे, श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान, जनता जनार्दन मंडळ, क्रांतिवीर राजगुरु मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ (अलका चौक), भोईराज मित्र मंडळ, शिवतेज ग्रुप, नटराज ग्रुप, श्रीकृष्ण मंडळ (ट्रस्ट), विश्वज्योत मित्र मंडळ (ट्रस्ट), कुंजीर तालीम उंबऱ्या गणपती मित्र मंडळ, शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (झाशीची राणी चौक), जनार्दन पवळे संघ, शिवशक्ती मंडळ तुळशीबाग, नेहरू तरुण मंडळ, कसबा पेठ आणि त्रिमूर्ती मित्र मंडळ, माणिक चौक, कसबा यांचा सह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button