
पुणे दि. 10 : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह नागपूरचे प्रसिद्ध उद्योजक अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्याशी निश्चित झाला आहे. या विवाहामुळे राज्यातील राजकीय आणि उद्योगविश्वात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.वर सारंग लखानी हे ‘विश्वराज ग्रुप’चे अध्यक्ष अरुण लखानी यांचे चिरंजीव असून, ते एक यशस्वी उद्योजक आहेत. यासोबतच ते उत्तम बॅडमिंटनपटू म्हणूनही ओळखले जातात. वधू रेवती सुळे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून पदवी पूर्ण केली असून, सारंग लखानी यांनी कोलंबिया बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापन विषयाचे शिक्षण घेतले आहे.या विवाहाची अधिकृत माहिती माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे आणि रेवती सुळे यांचे बंधू विजय सुळे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली. त्यांच्या पोस्टमुळे या बातमीला दुजोरा मिळाला.दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार हा विवाह जुळवून आणण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे समजते. त्यामुळे हा विवाह केवळ कौटुंबिक न राहता, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्याही चर्चेचा विषय ठरत आहे.